तासगावात आर.ओ. वॉटर असोसिएशनचे मार्गदर्शन शिबिर उत्साहात
आर.ओ. वॉटर असोसिएशन, तासगाव तालुक्याच्या वतीने आर.ओ. उद्योगातील व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर उत्साहात संपन्न झाले.
आर.ओ. वॉटर असोसिएशन, तासगाव तालुक्याच्या वतीने आर.ओ. उद्योगातील व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर उत्साहात संपन्न झाले.
आदिवासी समाजातील गरोदर माता घरीच प्रसूती करतात, अशी रूढी अजूनही काही भागांत दिसून येते. मात्र योग्य मार्गदर्शन आणि वेळेवर हस्तक्षेप झाला तर जीव वाचू शकतो, हे सांगलीच्या बेंद्री गावातील एका घटनेने पुन्हा सिद्ध केले आहे. कल्पना राजेश वाघमारे या आदिवासी गरोदर मातेला तीव्र पोटदुखी झाल्यानंतर आशा स्वयंसेविका, १०८ रुग्णवाहिका आणि ग्रामीण रुग्णालय तासगावच्या डॉक्टरांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे प्रसूती यशस्वीरीत्या झाली. माता व बाळ दोघेही सुरक्षित आहेत.
ज्या आर. आर. आबांनी व्यसनमुक्तीचा संदेश देत महाराष्ट्राला नवी दिशा दिली, त्यांच्याच पुतळ्यासमोर दारूचा अड्डा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार तासगावात समोर आला आहे. पुतळ्यासमोरील दारूच्या दुकानातून दारू खरेदी करून काही जण थेट पुतळ्याच्या परिसरातील कट्ट्यावर बसून मद्यपान करत आहेत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून, हे दारूचे दुकान बंद करण्याची मागणी उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान यांनी केली आहे.
तासगाव : आमदार रोहित पाटील यांच्या पुढाकारानंतर तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने बेदाणा सौद्यावेळी बेदाणा उधळू नये, सौद्यात घेतलेला बेदाणा पुन्हा बॉक्समध्ये ठेवावा, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्याला सौद्यातून बाहेर काढण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी झालेल्या बेदाणा सौद्यात व्यापारी विनीत बाफना यांनी बेदाणा उधळल्याचा आरोप करत मनसे जिल्हा संघटक अमोल काळे यांनी बाजार समिती प्रशासनाकडे धडक देत परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जप्रकरणी सांगली येथील तरुण विधिज्ञ ॲड. अभिषेक पांडुरंग खोत यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC), नवी दिल्ली यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. मानवी हक्क संरक्षण अधिनियम, १९९३ अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीत विद्यार्थ्यांच्या घटनात्मक व मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संकेत पाटील / तासगाव जप्त मुद्देमालात काय?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या मुद्देमालात क्रीम, श्रीखंड, बासुंदी, खवा यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचा मोठ्या…
यंदा उन्हाळी पाऊस अत्यंत कमी झाल्याने चिंतेत असलेल्या सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यासाठी रविवारचा दिवस दिलासादायक ठरला. दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन तालुक्यात सर्वदूर वळीवाच्या जोरदार सरी कोसळल्या.
तासगाव मध्ये विद्रोही सांस्कृतीक चळवळ,अंधश्रध्दा निर्मुलन समिती,राष्ट्र सेवा दल,पुरोगामी पक्ष आणि संघटनेच्या वतीने आज शिवराज्याभिषेक दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
ध्येय डोळ्यासमोर ठेऊन जिद्दीने पाऊल टाकत प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते अगदी असेच चित्र तासगांवात पाहवयास मिळाले आहे. येथील पत्रकार सुनिल गायकवाड यांचा मुलगा सार्थक सुनिल गायकवाड याने अत्यंत जिद्दीने पाऊल टाकत इंडियन एअर फोर्स परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात पास होण्याचा बहुमान मिळवला असून त्याची एअरमनपदी निवड झाली आहे.
शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला गती देण्यासाठी शिव उद्योग सहकार सेनेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात नवचैतन्य निर्माण होत असून, या पार्श्वभूमीवर कुलदीप देवकुळे यांची शिवसेना शिव उद्योग सहकार सेना, सांगली जिल्हा (पश्चिम महाराष्ट्र विभाग) जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.