तासगावात विविध संघटनांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

तासगाव /प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे ,चरित्राचे आणि कर्तृत्वाचे स्मरण करुन समतेच्या मूल्यविचाराला अंगीकारुन कोणत्याही धर्माचा व्देष करणार नाही,महीलांचा आदर करुन ,कोणत्याही अंधश्रध्देला बळी पडणार नाही अशी शपथ यावेळी अमर खोत यांनी उपस्थित शिबवाच्या मावळ्यांना दिली.

   तासगाव मधील वेगवेगळ्या प्रश्नांबाबत संघटीतपणे एकत्र येऊन काम करण्याची गरज ओळखून, छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या रंगरंगोटीची गरज असल्या बाबत  प्रशासनाला निवेदन देणे.
   सांगली नाका येथे नगरवाचनालय पुर्ववत सुरू करणे .याबाबत प्रशासनांकडे पाठपुरावा करण्यासंबंधी विचार झाला.

     यावेळी ज्येष्ठ विचारवंत डाॅ बाबुराव गुरव,बाबुराव जाधव,प्रा.वासुदेव गुरव,विनायक गुरव, प्रा. राजेश रोमन,उत्तम परिट,सौ नुतन परिट,शामराव पाटील,सुधाकर कोळी,प्रा.रमेश कुंभार,शिवाजी शिंदे,भरत थोरात,बाबासो थोरात,दत्तात्रय बामणे,जगन्नाथ शेवाळे,परशराम लुगडे ,चित्रपट निर्माते प्रा.सुर्यकांत शिंदे,सुधीर नलवडे,विशाल चांदुरकर,प्रा वल्लभदास शेळके, रमेश गायकवाड उपस्थित होते.प्रा वासुदेव गुरव यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *