‘अटल आनंदवन’ उपक्रमातून हरित महाराष्ट्राला हातभार; आरोग्य केंद्राच्या लोकसहभागातून उभारलेल्या सुविधांचा सत्कार

तासगाव तालुक्यातील बोरगाव येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर परिसरात आरोग्य विभाग व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘हरित महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत ‘अटल आनंदवन’ वृक्षलागवड मोहीम उत्साहात पार पडली. या मोहिमेत तब्बल साडेसात हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.

Continue reading

तासगावात आर.ओ. वॉटर असोसिएशनचे मार्गदर्शन शिबिर उत्साहात

आर.ओ. वॉटर असोसिएशन, तासगाव तालुक्याच्या वतीने आर.ओ. उद्योगातील व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर उत्साहात संपन्न झाले.

Continue reading

एक आशा, एक कॉल आणि दोन जीवांची सुटका; तासगाव मधील हृदयस्पर्शी घटना.

आदिवासी समाजातील गरोदर माता घरीच प्रसूती करतात, अशी रूढी अजूनही काही भागांत दिसून येते. मात्र योग्य मार्गदर्शन आणि वेळेवर हस्तक्षेप झाला तर जीव वाचू शकतो, हे सांगलीच्या बेंद्री गावातील एका घटनेने पुन्हा सिद्ध केले आहे. कल्पना राजेश वाघमारे या आदिवासी गरोदर मातेला तीव्र पोटदुखी झाल्यानंतर आशा स्वयंसेविका, १०८ रुग्णवाहिका आणि ग्रामीण रुग्णालय तासगावच्या डॉक्टरांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे प्रसूती यशस्वीरीत्या झाली. माता व बाळ दोघेही सुरक्षित आहेत.

Continue reading

मनोज जरांगेंच्या उपोषणाला तासगावातून पाठिंबा; सकल मराठा समाजाचे तहसीलदारांना निवेदन

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांच्या तब्येतीत घसरण होत असूनही शासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने मराठा समाजात संताप आहे.

Continue reading

तासगावात आबांच्या पुतळ्यासमोरच दारूचा अड्डा! दारू दुकान बंद करण्याची उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान यांची मागणी; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

ज्या आर. आर. आबांनी व्यसनमुक्तीचा संदेश देत महाराष्ट्राला नवी दिशा दिली, त्यांच्याच पुतळ्यासमोर दारूचा अड्डा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार तासगावात समोर आला आहे. पुतळ्यासमोरील दारूच्या दुकानातून दारू खरेदी करून काही जण थेट पुतळ्याच्या परिसरातील कट्ट्यावर बसून मद्यपान करत आहेत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून, हे दारूचे दुकान बंद करण्याची मागणी उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान यांनी केली आहे.

Continue reading

Dadasaheb Phalke Chitranagari Controversy: कंत्राटी जनसंपर्क अधिकाऱ्यावर गंभीर आरोप; 7 दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश

मुंबई : गोरेगाव येथील Dadasaheb Phalke Chitranagari अर्थात दादासाहेब फाळके चित्रनगरीतील कंत्राटी जनसंपर्क अधिकारी Pankaj Chavan यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पदाचा गैरवापर, financial irregularities, शासकीय सुविधांचा कथित गैरवापर आणि निविदा प्रक्रियेत अनियमितता केल्याचे आरोप करण्यात आले असून, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

Continue reading

बेदाणा उधळणारा व्यापारी विनीत बाफनाचा परवाना रद्द करून फौजदारी गुन्हा दाखल करा

तासगाव : आमदार रोहित पाटील यांच्या पुढाकारानंतर तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने बेदाणा सौद्यावेळी बेदाणा उधळू नये, सौद्यात घेतलेला बेदाणा पुन्हा बॉक्समध्ये ठेवावा, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्याला सौद्यातून बाहेर काढण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी झालेल्या बेदाणा सौद्यात व्यापारी विनीत बाफना यांनी बेदाणा उधळल्याचा आरोप करत मनसे जिल्हा संघटक अमोल काळे यांनी बाजार समिती प्रशासनाकडे धडक देत परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.

Continue reading

चिंचणीच्या 8 तरुणांची एकाच वेळी भरती; तालुकाभर कौतुक

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील चिंचणी गावाने यंदाच्या भरतीमध्ये तालुक्यात डंका वाजवला आहे. एकाच वेळी आठ तरुण-तरुणींची विविध पोलीस दले आणि अग्निशमन दलात निवड झाली असून विशेष म्हणजे यामध्ये तीन मुलींचा समावेश आहे. सर्वसामान्य कुटुंबातील या मुला-मुलींनी सातत्याने मेहनत घेत, अपयशाला तोंड देत आणि स्वप्नांसाठी संघर्ष करत यश मिळवले आहे. तालुक्यात पूर्वीपासून असलेला डांबरट पणाचा शिक्का या तरुणांनी मोडीत काढला आहे.यातील काही तरुण गेले दहा, दहा वर्ष भरतीचा सराव करत होते. पण ते मागे हटले नाहीत.

Continue reading

दिल्लीतील विद्यार्थी लाठीचार्जप्रकरणी सांगलीच्या तरुण वकिलाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव

दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जप्रकरणी सांगली येथील तरुण विधिज्ञ ॲड. अभिषेक पांडुरंग खोत यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC), नवी दिल्ली यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. मानवी हक्क संरक्षण अधिनियम, १९९३ अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीत विद्यार्थ्यांच्या घटनात्मक व मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Continue reading

तासगाव पालिकेचा पाणी बचतीसाठी स्तुत्य पुढाकार:

संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळजन्य परिस्थितीचा विचार करून तासगाव नगरपरिषदेने पाणी बचतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे, रस्ते आणि इतर सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे शुद्ध पिण्याचे पाणी बंद करून त्याऐवजी विहिरीतील पाण्याचा वापर करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे.

Continue reading