चिंचणीच्या 8 तरुणांची एकाच वेळी भरती; तालुकाभर कौतुक

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील चिंचणी गावाने यंदाच्या भरतीमध्ये तालुक्यात डंका वाजवला आहे. एकाच वेळी आठ तरुण-तरुणींची विविध पोलीस दले आणि अग्निशमन दलात निवड झाली असून विशेष म्हणजे यामध्ये तीन मुलींचा समावेश आहे. सर्वसामान्य कुटुंबातील या मुला-मुलींनी सातत्याने मेहनत घेत, अपयशाला तोंड देत आणि स्वप्नांसाठी संघर्ष करत यश मिळवले आहे. तालुक्यात पूर्वीपासून असलेला डांबरट पणाचा शिक्का या तरुणांनी मोडीत काढला आहे.यातील काही तरुण गेले दहा, दहा वर्ष भरतीचा सराव करत होते. पण ते मागे हटले नाहीत.

Continue reading

दिल्लीतील विद्यार्थी लाठीचार्जप्रकरणी सांगलीच्या तरुण वकिलाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव

दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जप्रकरणी सांगली येथील तरुण विधिज्ञ ॲड. अभिषेक पांडुरंग खोत यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC), नवी दिल्ली यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. मानवी हक्क संरक्षण अधिनियम, १९९३ अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीत विद्यार्थ्यांच्या घटनात्मक व मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Continue reading