कोयनेचे वीज निर्मितीचे पाणी राखीव ठेवा संजय काका पाटील दुष्काळी पार्श्वभूमीवर आढावा बैठक,लोकांच्या हितासाठी काम करण्याचा अधिकार्‍यांना सल्ला

अल निनो चा प्रभाव आता सुरू झाला आहे पण तज्ञाच्या मते पुढील वर्षी सुद्धा हा हा प्रभाव राहून दुष्काळी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कोयनेतून वीज निर्मिती करून थेट अरबी समुद्रात जाणारे 30 टीएमसी पाणी वाचवण्याची गरज आहे विजेसाठी आपण सौर ऊर्जा पवनचक्की औष्णिक ऊर्जा याची मदत घेऊ शकतो पण पाणी आपल्याला निर्माण करता येणार नाही. हे वाचवलेले तीस टीएमसी पाणी आपल्याला पुढील वर्षी पर्यंत वापरता येईल त्यासाठी मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेणार असल्याची माहिती माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली

Continue reading