कोयनेचे वीज निर्मितीचे पाणी राखीव ठेवा संजय काका पाटील दुष्काळी पार्श्वभूमीवर आढावा बैठक,लोकांच्या हितासाठी काम करण्याचा अधिकार्‍यांना सल्ला

संकेत पाटील /तासगाव

दरम्यान यावेळी सांगली जिल्हयातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या पाणी टंचाई व चारा टंचाईमुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना शासन स्तरावरुन लवकरात लवकर मदत मिळणेबाबत तसेच रोजगार उपलब्धतेसाठी रोजगार हमी योजनेची प्रभावी व सक्षमपणे अमलबजावणी करणे साठीचे निवेदन तहसीलदार अतुल पाटोळे यांना देण्यात आले

या विषयान्वये, यावर्षी एल निनो वादळाच्या प्रभावामुळे
दुष्काळा च्या पार्श्वभूमीवर तासगाव तालुक्यातील संभाव्य टंचाई पाणीसाठा व पशुधनासाठी लागणारा चारा याचा आढावा घेण्यासाठी तासगाव तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत संजय काका बोलत होते
तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे पंचायत समितीच्या सभापती अरुणा पाटील उपसभापती सुखदेव पाटील जिल्हा परिषद सदस्य शशिकांत जमदाडे पंचायत समिती सदस्य सुनील जाधव प्रमोद शेंडगे महेश पाटील उमेश पाटील ऋषिकेश बिरणे माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील उपस्थित होते
यावेळी बोलताना संजय काका पाटील यांनी दुष्काळी परिस्थितीची दाहकता सगळ्यांसमोर मांडली. ते म्हणाले मी आजच पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर सांगलीत बैठक घेऊन आलो आहे म्हैशाळ ताकारी टेंभू चे पाणी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय पण पाणी वाचवणे उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे जनावरांसाठी चारा उपलब्ध करणे. फळबागा वाचवणे यासाठी प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी संयुक्त प्रयत्न करणे गरजेचे आहे लोकांनी हाडाची काड करून जगवलेल्या द्राक्षबागा डाळिंबाच्या बागा फळबागा त्याचबरोबर जनावर जगवणं ही सध्याची वेळ आहे त्या पद्धतीने केवळ नियमाचा बगलबुवा किंवा सरकारची बाजू न घेता अधिकाऱ्यांनी लोकांच्या बरोबर राहावे. येणाऱ्या दुष्काळाला सामोरे जाताना केवळ प्रशासकीय अधिकारी तुम्ही नव्हे तर आम्हीही लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या सोबत आहोत मिळून उपाययोजना करूया अशा सूचना माजी खासदार संजय काका पाटील यांनी केल्या.
यावेळी तहसीलदार कृषी पशुसंवर्धन पाटबंधारे या विभागाच्या विभाग प्रमुखांनी तालुक्यातील परिस्थितीची माहिती व करावयाच्या उपयोजनांची माहिती काकांना दिली
बैठकीच्या सुरुवातीला तासगाव तालुक्यातील तलावातील पाणी साठ्याची माहिती घेण्यात आली. त्याचबरोबर तालुक्यातील पशुधनाची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी काय करावे लागेल याबाबत चर्चा झाली. यावेळी अधिकाऱ्यांनी तासगाव तालुक्यातील तलावातील पाणी साठ्यात तालुक्यातील गावांना अवघा महिन्यात भर पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याची माहिती दिली.

कोट
या भीषण परिस्थितीत अधिकाऱ्यांनी केवळ नियमावर बोट ठेवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करू नये. लोकांनी वर्षानुवर्षे घालवून फळबागा जगवल्या आहेत. पशुपालकांच्या व्यथा अजून वेगळ्या आहेत. तरीही लोक संघर्ष करत आहेत. लोकांच्या बरोबर राहून अधिकाऱ्यांनी मदतीची भूमिका घ्यावी. लोकांचा उद्रेक झाला तर परिस्थिती कोणाच्या हातात राहणार नाही .
-संजयकाका पाटील
माजी खासदार

चौकट
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी तत्काळ दुष्काळ घोषित करण्याची मागणी केली यावेळी संजय काकांनी आपण इथं चमकोगिरी करायला आलो नाही आपल्याला स्टंटबाजी करायची नाही. आज आपण तालुक्यातल्या परिस्थितीची माहिती घेऊन लवकरच पालकमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे त्यावेळी दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करणार आहे त्यासाठीची लागणारी आकडेवारी व माहिती प्रशासनाकडून घेण्यासाठी आपण आलोय असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *