पिंपरी-चिंचवडमध्ये महावीर जन्मकल्याणक महोत्सव

 अहिंसा सप्ताह, रॅली व ४० हून अधिक कार्यक्रमाचे २५ ते ३१ मार्चदरम्यान आयोजन 

पिंपरी । राईट अँगल 

पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्या वतीने २५ ते ३१ मार्चदरम्यान भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव विविध धार्मिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांनी साजरा होणार आहे. २५ मार्चपासून अहिंसा सप्ताहाची सुरुवात कासारवाडी येथील प्यारीबाई पगारिया सभागृहात भक्तामर पठणाने होईल.

त्यानंतर विश्वशांती परिषद, पाणपोई उद्घाटन, अन्नधान्य वाटप, वृक्षारोपण, प्रश्नमंजुषा, आनंद चालीसा, ‘आनंद की रोटी’, चित्रकला व पाककला स्पर्धा असे विविध कार्यक्रम होणार आहेत. २९ व ३० मार्च रोजी रक्तदान, नेत्र, दंत व कर्करोग तपासणी शिबिरे, आयुर्वेदिक शिबिरे व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ३१ मार्च रोजी नवी सांगवी येथून दुपारी ३ वाजता अहिंसा रॅली काढण्यात येणार असून सायंकाळी निगडीतील ग.दि. माडगूळकर सभागृहात समारोप, भक्ती संध्या व अहिंसा पुरस्कार वितरण होईल. या महोत्सवात सुमारे ४० हून अधिक कार्यक्रमांचा समावेश आहे.

कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष श्रेयस पगारिया, कार्याध्यक्ष विजय भिलवडे, स्वागताध्यक्ष किरणभाई शहा, कोषाध्यक्ष नेनसुख मांडोत, महामंत्री संदीप फुलफगर, उपाध्यक्ष दिलीप भन्साळी, प्रकाश गादिया, शांतीनाथ पाटील, श्रेणिक मंडलेचा, मंत्री वीरेश छाजेड, सुरगोंडा पाटील, तुषार मुथा, संदेश गदिया, धीरज नहार तसेच डॉ. अशोककुमार पगारिया, अजित पाटील, नितीन बेदमुथा, विलासकुमार पगारिया, प्रा. प्रकाश कटारिया, वीरेंद्र जैन, उमेश पाटील यांनी केले.

————————

बातमीसाठी संपर्क

प्रदीप लोखंडे : 7350266967

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *