चिंचणीच्या 8 तरुणांची एकाच वेळी भरती; तालुकाभर कौतुक

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील चिंचणी गावाने यंदाच्या भरतीमध्ये तालुक्यात डंका वाजवला आहे. एकाच वेळी आठ तरुण-तरुणींची विविध पोलीस दले आणि अग्निशमन दलात निवड झाली असून विशेष म्हणजे यामध्ये तीन मुलींचा समावेश आहे. सर्वसामान्य कुटुंबातील या मुला-मुलींनी सातत्याने मेहनत घेत, अपयशाला तोंड देत आणि स्वप्नांसाठी संघर्ष करत यश मिळवले आहे. तालुक्यात पूर्वीपासून असलेला डांबरट पणाचा शिक्का या तरुणांनी मोडीत काढला आहे.यातील काही तरुण गेले दहा, दहा वर्ष भरतीचा सराव करत होते. पण ते मागे हटले नाहीत.

Continue reading

तासगावच्या सार्थक गायकवाडची एअर फोर्स मध्ये निवड.

ध्येय डोळ्यासमोर ठेऊन जिद्दीने पाऊल टाकत प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते अगदी असेच चित्र तासगांवात पाहवयास मिळाले आहे. येथील पत्रकार सुनिल गायकवाड यांचा मुलगा सार्थक सुनिल गायकवाड याने अत्यंत जिद्दीने पाऊल टाकत इंडियन एअर फोर्स परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात पास होण्याचा बहुमान मिळवला असून त्याची एअरमनपदी निवड झाली आहे.

Continue reading

Ulka Pisal Success Story: Tractor चालवत कुटुंब उभं करणाऱ्या सांगलीतील महिला शेतकऱ्याची प्रेरणादायी यशोगाथा

कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ट्रॅक्टर घेतला. पण ड्रायव्हर काम सोडून पळून गेला. मग काय ? सांगलीच्या या रणरागिणीने ट्रॅक्टरचे स्टीअरिंग सांभाळत करोडो रुपयांची उलाढाल केली. आपल्या कुटुंबाला उभे केले. वाचा उल्का पिसाळ (Ulka Pisal success story) यांची प्रेरणादायी यशोगाथा राईट अँगलच्या या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये.Right Angle ground report

Continue reading