अजित दादांचा अपघात, रुपाली चाकणकर आणि नरहरी झिरवळ यांच्याभोवती निर्माण झालेली चर्चा अचानक शांत का झाली? जाणून घ्या यामागे काय आहे षडयंत्र
मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. सार्वजनिक जीवनात काम करत असल्याने त्यांच्या त्या खाजगी क्षणांवर चौफेर टीका झाली. यानंतर त्यांचे मंत्रीपद जाणार अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली. पण त्यानंतर महाराष्ट्रात एकामागून एक अशा काही घटना घडत गेल्या ज्यामध्ये झिरवळ यांची चर्चा मागे पडली. झिरवळ यांच्या प्रकरणामुळे रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावरील खरात प्रकरणातील रोष राजकीय टीका मागे पडल्या. राजकारणात अशा विविध घटना समोर येणे हा निव्वळ योगायोग नसतो. या घटनांची व्यूहरचना करण्यासाठी अनेक हात काम करत असतात. मानसशास्त्रीय आखाड्यांवर आधारित मीडिया स्ट्रॅटेजी बनत असते. वरवरून पाहताना आपल्याला या घटना अत्यंत साध्य आणि उत्स्फूर्तपणे घडलेल्या वाटतात. एखादा नेता अचानकच वादग्रस्त धार्मिक वक्तव्य करतो. सगळ्या माध्यमाचे लक्ष त्याकडे वळवले जाते. वादात अडकलेल्या नेत्याला ठराविक नेत्यांकडून कव्हर फायरिंग दिली जाते. या गदारोळात जनता मूळ मुद्दा विसरते. जनता विसरत नाही तर तिने मूळ मुद्दा विसरावा यासाठीच ही स्ट्रॅटेजी बनवलेली असते.
political controversy Maharashtra, viral video politics, media strategy India
यामागे असलेल्या संकल्पनेला Agenda Setting Theory असे म्हणतात. यामध्ये लोकांनी कोणत्या मुद्द्यांवर विचार करावा हे स्टुडिओतून ठरते. वेगवेगळ्या मीडिया हाऊसमधून, सोशल मीडियातून तेच तेच विषय लोकांच्या डोक्यावर फायर केले जातात. सातत्याने समोर येणारे हेच विषय लोकांना अति महत्वाचे वाटू लागतात. उदा: देशातील प्रमुख व्यक्तिच्या निर्णयावर जोरदार टीका होत असते तेंव्हा अचानकच राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा माध्यमांच्या केंद्रस्थानी येतो. यामध्ये मूळ मुद्दा अलगदपणे मागे पडतो.
agenda setting theory in politics, media influence public opinion
याच प्रकारची दुसरी एक पद्धत आहे. तिला Distraction किंवा मराठीत लक्ष विचलित करण्याची पद्धत असे संबोधले जाते. नेता अडचणीत आला, त्याच्यावर टीका होऊ लागली की राज्यातील ठराविक लोकांचे एखादे विशिष्ट धार्मिक अथवा वादग्रस्त विधान पुढे येते. वरवरून तुम्हाला हा नेता या विचारांशी किती एकनिष्ठ आहे, किती कट्टर आहे असे वाटत असेल पण त्याचा हा कट्टरपणा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून त्याच्या पक्षाकडून गटाकडून मुख्य विषयावर लक्ष विचलित करण्यासाठी केलेला डावपेच असतो. लोक त्याच भावनिक भडकाऊ मुद्द्यात गुंतून राहतात. महाराष्ट्रातील याची ठळक उदाहरणे तुमच्या लक्षात येतील.
distraction strategy politics, media diversion tactics
एखाद्या सरकारच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा समोर आला की मुख्य विषयापासून पूर्णपणे वेगळा मुद्दा पुढे आणून चर्चा भरकटवली जाते. उदाहरणार्थ एखाद्या पत्रकाराने थेट प्रश्न विचारला की या प्रकरणात गैरव्यवहार झाला का? यावर उत्तर देणारा व्यक्ती मूळ प्रश्न टाळून मागील सरकारने काय केलं होतं ते बघा असं म्हणतो. यामुळे चर्चेचा फोकसच बदलतो. सराईतपणे मूळ प्रश्नाला बगल मिळते.
red herring fallacy examples, political debate tactics
यामध्ये दुसरी एक धूर्त पद्धती वापरण्यात येते. एखाद्या व्यक्तीला एखादा प्रश्न विचारला तर ती म्हणते हा प्रश्न तुम्ही त्यांना का विचारत नाही. उदा. हिंदू धर्मातील अंधश्रद्धांवर कुणी आवाज उठवला तर काही लोक ती चांगली वाईट यावर बोलत नाहीत ते म्हणतील तुम्हाला केवळ हिंदूंच्याच अंधश्रद्धा दिसतात का? मुस्लिमांच्या ख्रिश्चनांच्या अंधश्रद्धा दिसत नाहीत का? यामध्ये मूळ विषयाला बगल देऊन चर्चा केवळ वरवरच्या आरोप प्रत्यारोपामध्येच अडकते.
whataboutism in politics, propaganda techniques
तेंव्हा तुमच्यासमोर असे एखादे वक्तव्य त्याचा व्हिडीओ आला असेल तर तो आताच का आला? यामागे काही अजेंडा सेटिंग आहे का हे नक्की तपासा….
media manipulation, public perception psychology, political communication strategy
