उमटे धरणाच्या गाळासाठी ५ कोटीच्या निधीची तरतूद करण्याचे जि.प.अध्यक्षांना निवेदन,,,


शासकीय अधिकारी धरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नापेक्षा अजून कोणता मोठा प्रश्न असेल? असे वाटत नाही.
आपणांस सदरच्या निवेदनाव्दारे विनंती करतो की रा.जि.प. वार्षिक अर्थसंकल्प १७५ कोटीचा मांडू शकते. त्यामध्ये ५ कोटींचा निधी कठीण नाही .

मागील १२ वर्षांपासून अलिबाग तालुक्यामधील उमटे धरणाच्या गाळाचा व अशुध्द माती मिश्रीत पाण्याचा प्रश्न पेटला आहे. ३३ आदिवासी वाड्या व ४७ गावातील नागरीकांची तहान भागविणाऱ्या उमटे धरण सध्या सरकारच्या उदासिन धोरणामुळे गाळाने भरले आहे. सध्या चार दिवसांआड नागरीकांना मातीमिश्रित गढूळ पाणी पाजण्याचे काम आपली जिल्हा परिषद करीत आहे. सन २०२२ साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग माणगांव यांनी नेमणूक केलेल्या तांत्रिक सल्लागारामार्फत २१५ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतु तो प्रस्ताव आजही धूळखात पडला आहे. अशुध्द पाणी शुध्द करण्यासाठी जिल्हा परिषदेने ४.५ दलली क्षमतेचे जलशुध्दीकरण प्लांट बांधण्यात आला. परंतु फिल्टर प्लान्ट मागील ५ वर्षांपासून बंद आहे. सदरच्या फिल्टर प्लान्ट मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट होत आहे. मागच्या वर्षी ८ कोटींचे टेंडर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग माणगांव यांनी काढले होते पण शासन स्तरावर त्या आजही लटकले आहे.

आपल्या जिल्हा परिषदेकडे सध्या १५ व्या वित्त आयोगाचा ५० कोटी रुपयांचा निधी पडून आहे. सदरच्या निधी पैकी आपण उमटे धरणाचा गाळ व शुध्द पाण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा, उमटे धरण हे आपल्याच जिल्हा परिषदेच्या मालकीचे आहे. शासकीय अधिकारी धरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नापेक्षा अजून कोणता मोठा प्रश्न असेल? असे वाटत नाही.

आपणांस सदरच्या निवेदनाव्दारे विनंती करतो की रा.जि.प. वार्षिक अर्थसंकल्प १७५ कोटीचा मांडू शकते. त्यामध्ये ५ कोटींचा निधी कठीण नाही? त्यामुळे उमटे धरणाच्या गाळासाठी आपण ५ कोटीच्या निधीची तरतूद करुन उमटे धरणाचा गाळ काढण्यात तात्काळ सुरुवात करावी ही मागणी उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड यांच्या वतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *