धक्कादायक! चिपळूणमध्ये सत्य मांडणाऱ्या पत्रकारावर हल्ला
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर थेट आघात करणारी संतापजनक घटना घडली असून, आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या दूरदर्शन प्रतिनिधी दीपक भागवत यांच्यावर पतसंस्थेच्या समर्थकांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यातील पत्रकार वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
