कोकणातील Hapus Mango आंबा यंदा मोठ्या संकटात सापडला आहे. प्रतिकूल हवामान, धुक्याचे वाढते प्रमाण आणि बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम उत्पादनावर झाला असून अपेक्षित उत्पन्नाऐवजी केवळ १५ ते २० टक्केच आंबा तयार झाला आहे. वाढता उत्पादन खर्च आणि घटलेली गुणवत्ता यामुळे आंबा बागायतदार शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी ग्राहकांना अधिकाधिक आंबे खरेदी करून पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. (Konkan Mango Crisis, Mango Production Decline, Maharashtra Mango News) आंबा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा समोर आणणारा राईट अँगलचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा हा रिपोर्ट नक्की वाचा…
“तुम्हाला महागडी दारू विकत घ्यायला परवडते, सिगारेट गुटखा तंबाखू विकत घेऊन खायला परवडते मग प्रतिकूल हवामानामुळे महाग झालेला आंबा विकत घेऊन खायला का परवडत नाही?”
हा प्रश्न विचारलाय रायगडच्या Alibag तालुक्यातील जांभूळपाडा येथील आंबा बागायतदार शेतकरी डॉ. संदेश पाटील यांनी. यंदा कोकणातील आंबा बागांना मोठ्या प्रमाणात मोहर आला होता. अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन मिळेल अशी आशा आंबा बागायतदार शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. परंतु अचानक हवामान बदलले. धुक्याचे प्रमाण वाढले. प्रतिकूल हवामानामुळे केवळ १५ ते २० टक्केच उत्पादन तयार झाले आहे. (Bad Weather Impact on Mango Farming) आंबा बागांच्या फवारणीसाठी घातलेले पैसे देखील निघणे कठीण झाले आहे. यामुळे कोकणातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.

महाराष्ट्रात सुमारे ३.५७ लाख हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे. रायगड जिल्ह्यात ५६ ते ६० हजार आंबा बागायतदार आहेत. तर संपूर्ण कोकणात ही संख्या साडेचार लाखांच्या घरात आहे. देशाला राज्याला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणाऱ्या आंबा बागायातदारांपुढे यंदा मोठे संकट उभा राहिले आहे. उत्पादन घटण्यासोबतच यंदा आंब्याची गुणवत्ता देखील कमी झाली आहे. (Mango Export Issue India) परिणामी हे आंबे परदेशात जाऊ शकण्याच्या देखील अडचणी येत आहेत. या अडचणीतून आंबा बागायतदार शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने दिलासा देण्याची गरज आहे.
कोकणच्या हापूससमोरील आव्हाने कोणती ?
हापूस म्हणून कर्नाटकी आंब्यांची सर्रासपणे विक्री
कोकण तसेच महाराष्ट्राच्या इतर भागात रस्त्यारस्त्यावर कोकणचा हापूस म्हणून इतर कर्नाटकी आंब्यांची सर्रासपणे विक्री होत आहे. (Fake Hapus Mango Market) कर्नाटकी आंब्याचे हे मार्केट हाताबाहेर गेले असून ग्राहकांची फसवणूक होत आहे. याचा मोठा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसत आहे.
बदलत्या हवामानाचा आंबा पिकांना फटका
बदलत्या हवामानामुळे आंबा पिकांवरील फवारणीचा खर्च वाढत आहे. (Climate Change Impact Agriculture) कोकणात हवा प्रदूषणाचा देखील या पिकावर प्रतिकूल परिणाम होत आहे. कोकणातील प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
आंबा पिकांवरील किडीची प्रतिकार क्षमता वाढली
आंबा पिकांवरील किडींची प्रतिकारक्षमता वाढली आहे. प्रचलित असलेल्या औषधांमधून कीड व्यवस्थापन करणे कठीण होत आहे. (Mango Pest Resistance Problem) फवारण्यांची संख्या देखील वाढत आहे. यामुळे आंबा उत्पादनाचा खर्च वाढला आहे.
आंबा बागांच्या व्यवस्थापनाचा खर्च वाढला
मजूर वाहतूक तसेच इतर साधनांचा दर वाढल्याने आंबा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे आंब्याचे उत्पादन कमी तर दर वाढवावे लागत आहेत. (Mango Price Increase India) यामुळे आंबा खवय्यांनी आंब्याकडे पाठ फिरवली आहे. या तुलनेत इतर राज्यातील दर्जाहीन आंबा खरेदी करण्याकडे त्यांचा कल वाढला आहे.
कृषी विद्यापीठांमध्ये गुणवत्तापूर्ण संशोधनाची गरज
कृषी विद्यापीठांनी आंबा बागायतदारांपुढे निर्माण झालेल्या या समस्यांवर उपाय शोधणे अपेक्षित आहे. पण हे होत नसल्याने भरमसाठ खर्च होत असलेल्या विद्यापीठांचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा होत नाही. (Agriculture Research India) विद्यापीठांनी नवनवीन गुणवत्तापूर्ण संशोधन करून आंबा बागायतदारांच्या समोर उभ्या राहिलेल्या संकटांवर उपाय शोधण्याची गरज आहे.
कोकणचा आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. (Konkan Farmers Crisis) लोकांनी जास्तीत जास्त आंबे खरेदी करून त्यांना दिलासा द्यावा तसेच सरकारने अधिकाधिक नुकसानभरपाई जाहीर करून शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्याची गरज आहे.
