पवना जलवाहिनी पूर्णत्वासाठी सत्ताधाऱ्यांपुढे आर्थिक पेच
केंद्रासह राज्यात सत्ता ; तरीही महापालिका ठेवींवर डोळा पिंपरी ! प्रदीप लोखंडे पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पवना…
केंद्रासह राज्यात सत्ता ; तरीही महापालिका ठेवींवर डोळा पिंपरी ! प्रदीप लोखंडे पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पवना…
जगाच्या इतिहासात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या महाड क्रांतिभूमीतील सामाजिक समतेच्या चवदार तळे पाणी सत्याग्रह लढ्याला ऐतिहासिक महत्व आहे. याच धर्तीवर दि.१९/२० मार्च २०२६ रो कोकणातील महाड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक महाड चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहन कार्यक्रमाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होणार आहे. भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीत, महाड चवदार तळे सत्याग्रहाचे खूप मोठे महत्व आहे.याच सत्याग्रह आंदोलनातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय नेतृत्व उदयास आले व दलितांच्या आत्मसन्मानाच्या लढाईचा प्रारंभ झाला.
पिंपरी-चिंचवड शहरात मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या १०० फूट उंच छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा प्रकल्पावर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला आहे. मात्र, कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही प्रकल्प अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही. दरम्यान, उर्वरित कामांसाठी सुमारे ५० कोटी रुपयांच्या दोन नव्या निविदा काढण्याचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांकडून पुढे आल्याची चर्चा आहे. या निर्णयावर विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर निविदांचा प्रस्ताव तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे पुतळा प्रकल्पातील खर्च आणि कामाच्या गतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गॅस सिलेंडरच्या (Lpg Gas cylendar) तुटवड्याने ग्रामीण भागातील लोकांनी पुन्हा चुली पेटवायला सुरवात केली आहे. या निमित्ताने ग्रामीण भागातील चुलीच्या आठवणी जाग्या करणारा हा विशेष लेख नक्की वाचा.
मोशी येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरातील विकास कामांसाठी काढण्यात आलेल्या निविदांवर अनियमिततेचा संशय व्यक्त करत शिवसेना स्थायी समिती सदस्य सुलभा उबाळे यांनी आक्षेप नोंदवला आहे. पुतळ्याला किंवा त्या ठिकाणच्या विकासकामांना आमचा अजिबात विरोध नसून, छत्रपती संभाजी महाराज हे देशाची अस्मिता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर (Mayor Sharmila Babar) यांनी आज पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल ( Yashwantrao Chavan Memorial Hospital) रुग्णालयाला भेट देत रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. यावेळी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे (doctor rajendra wable) यांनी संपूर्ण रुग्णालयाचा सविस्तर आढावा उपमहापौर यांना दिला.
उद्योजक आणि कामगार वाचविण्यासाठी गॅसचा राखीव कोटा द्या, पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेची मागणी
तासगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी अरुणा महेश पाटील यांची तर उपसभापतीपदी सुखदेव भीमराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने ही निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली तसेच गुलाल उधळून आनंद साजरा केला.
प्रभाग दोन मधील सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी पाहणी पुणे ! प्रतिनिधी पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून नगरसेविका…
१५० अर्ज दाखल ; कोअर कमिटीच्या बैठकीत नावांवर चर्चा; प्रदेश पातळीवर अंतिम शिक्कामोर्तब पिंपरी । प्रदीप लोखंडे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत…